Recent Event Highlights: marathi newspaper Krishival.in maharashtra times, Dagadusheth Ganpati.wmv, Marathi Actor Holi, Sachin Pilgaonkar interview, latur zp corruption, ideachi kalpana - mahesh kothare, and 144 more...
Created by dipity on Feb 23, 2009
Last updated: 07/29/11 at 06:16 PM
Esakal has no followers yet. Be the first one to follow.
www.krishival.in sakal marathi newspaper maharashtra times marathi newspaper lokmat lokmat marathi news paper samna marathi newspaper www.esakal.com marathi newspaper Krishival.in maharashtra times http www.krishival.in
www.krushival.in marathi news paper samna marathi newspaper www.esakal.com saamana lokmat marathi newspaper www.lokmat.com,www.krushival.in
Shrimant Dagadusheth Halwai Ganapati celebrated Mogra Mahotsav on Friday 22nd April, on the occasion of second Chaturthi of Chaitra, the first month of Hindu almanac.
मल्लिका शेरावतची शीला, मुन्नीला टक्कर (व्हिडिओ) शीला मुन्नीला टक्कर देण्यासाठी आता मल्लिका शेरावत सज्ज झालीय. या वर्षात मल्लिका शेरावतची दोन हॉट आयटम नंबर येत आहेत. 'थँक यू' या आपल्या आगामी चित्रपटात 'रझिया गुंडो मे फंस गयी' हे गाणे प्रसिद्ध होत असताना आता 'डबल धमाल' या चित्रपटातून ती जलेबी बाई हा आयटम नंबरही करत आहे. थँक यू एप्रिलमध्ये, तर डबल धमाका जूनमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
मुंबई - ढणढण करणारा डीजे... त्यासोबतीला रंगांची, पाण्याची बरसात आणि रंगझिंग होऊन बेभान नाचणारी कलाकार मंडळी अशा जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात मराठी कलाकारांचे होळी सेलिब्रेशन साजरे झाले.
एकदा तरी अनुभवावा असा जन्मसोहळा! प्रसाद इनामदार - सकाळ वृत्तसेवा वेळास - सकाळी सातची वेळ... समुद्राची गाज आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने सारा भवताल भरून गेलेला. सूर्याच्या आगमनाची चाहूल लागलेली. नेमक्या याच प्रसन्न क्षणी येथील किनाऱ्यावरील कासवांच्या घरट्यांमधून ऑलिव्ह रिडलेची पिले बाहेर पडली आणि किनाऱ्यावरील वाळूवर सुरेख नक्षी रेखत, धडपडत, अंगातील बळ पायांत एकवटत समुद्राच्या दिशेने झेपावली. जन्मानंतर अगदी पहिल्यांदाच भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांवर स्वार झाली.
पुणे - २००७ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या धीरगंभीर स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी मुलतानीमधील दोन बंदिशी, 'अवघाची संसार' ही भक्तिरचना आणि नंतर ठुमरी सादर केली होती. पंडितजी आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे अजरामर स्वर मात्र कायम राहणार आहेत. (व्हिडिओ - संतोष धायबर)
मुंबई - सचिन पिळगावकर दिग्दर्शित आयडियाची कल्पना सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. महेश कोठारे-अशोक सराफ आणि सचिन असं मराठीतले दिग्गज पहिल्यांदाच मराठी सिनेमातून एकत्र झळकणार आहेत. निर्मिती सावंत आणि भार्गवी चिरमुले यांच्याही या धमाल चित्रपटात हटके भूमिका आहेत.
मुंबईः राजा शिवछत्रपती मालिकेतून डॉ. अमोल कोल्हेंनी छोटा पडदा गाजवला होता. आता त्यांचे दोन चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेत. त्यामुळे पदार्पणातच मोठ्या पडद्यावरही अमोल कोल्हेंनी जोरदार एन्ट्री केलीय. आघात आणि ऑन ड्युटी २४ चोवीस तास हे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर राजमाता जिजाऊ हा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच या अनोख्या अनुभवाविषयी अमोल कोल्हेंनी दिलखुलास गप्पा मारल्या....
केदार शिंदे दिग्दर्शित ऑन ड्युटी २४ तास चित्रपट प्रदर्शित झालाय. अमोल कोल्हे आणि नकुल घाणेकर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. क्रांती रेडकरही यात एका हटके भूमिकेत झळकत आहे. सिनेमाचा एकूणच अनुभव कसा होता, त्याविषयी गप्पा मारूयात केदार शिंदे आणि त्यांच्या ऑन ड्युटी टिमशी....
मुंबई: 'जोगवा', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा हिट सिनेमांनंतर अभिनेत्री मुक्ता बर्वे 'आघात' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'आघात' आज प्रदर्शित होत आहे.
PMPML bus gutted fire near Yerawada, Pune
Story about Jagdish Gaikwad, who wears gold ornaments.
पुणे - डान्स इडिया डान्स, बुगी वुगी, एका पेक्षा एक अशा टॅलेंट हंट कार्यक्रमांमधून लहान मुले आपली पदन्यासातील चपळाई सिद्ध करण्यात गुंतले आहेत.
गेले दोन दिवस सातत्याने लातूर जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार साम वाहिनीवरून मांडण्यात येत आहे. तेथील खासगी शाळात बोगस विद्यार्थी दाखवून कशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे. पण हे प्रकरण इथेच थांबलेले नाही.
बोगस विद्यार्थी संख्या दाखवून लातूर जिल्ह्यातील 33 शाळांनी सरकारचे अनुदान लाटले आहे. सुमारे 50 कोटी रूपयांच्या भ्रष्ट्राचाराचे हे प्रकरण आहे. या सर्व प्रकरणात कुठे आणि कसा भ्रष्ट्राचार झाला आहे याचा हा रिपोर्ट ...
नाशिक - स्मृतींची पाने चाळताना एखादा दस्तऐवज हाती लागावा आणि त्यातून नव्या शोधासाठी प्रेरणा मिळावी, असेच काहीसे फिल्म्स डिव्हिजनच्या माहितीपटांद्वारे झाले आहे.
आयडियाची कल्पना या सिनेमातून सचिन पिळगावकरसह महेश कोठारे आणि अशोक सराफ हे त्रिकुट एकत्र आले आहे. अवधुत गुप्तेंनी संगीत दिलेल्या सिनेमात या त्रिमुर्तींनी काय काय धमाल केली आहे जाणून घेवून या अशोक सराफ यांच्याकडून ....
गोसेखुर्द प्रकल्पामुळे चाळीस गावांतील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. बऱ्याच कुटुंबियांचे संसार अक्षरक्ष: पाण्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत तेथील गावकरी कसे जीवन जगत आहेत. याची एक झलक ....
शेतीला उच्च तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रगतीची कास धरणाऱया शेतकऱयाची कथा.
रत्नागिरी जिल्ह्यात 140 देवस्थानांच्या मालकीची 2854 हेक्टर जमीन परस्पर लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी नियम धाब्यावर बसवत काही जागांवर घरे बांधण्यात आली असून, काही जमिनी परस्पर विकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणातील सर्व देवस्थानांच्या जमिनींची छाननी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
कोल्हापूर - महालक्ष्मीची आज पारंपारिक पद्धतीने पंचमी निमित्त अंबारातील त्र्यंबोली भेट रुपातील पूजा बांधण्यात आली होती. दिवसभर मंदिरात गर्दीचे प्रमाण थोडे कमी होते.
कोल्हापूर - आद्यशक्तिपीठ असलेल्या येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला होता. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांचे लोंढे येतच होते. एका दिवसात सुमारे लाखावर भाविकांनी गर्दी केल्याने बंदोबस्तावरील पोलिस, देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक सेवाभावी संस्थेच्या लोकांची तारांबळ उडाली. अनेकांनी रविवार या सुटीच्या दिवसाचा मुहूर्त साधल्यामुळे कोल्हापूरने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी अनुभवली. तीन दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
music city-bela shende-24-9-10
महालक्ष्मी आरती भक्त जेव्हा देवीची पूजा करतो, तेव्हा त्याचे अंत:करण दाटून येते. देवी मातेच्या प्रेमाने भगवद्प्रेमाने अंत:करणात आर्तता निर्माण होते. या अवस्थेत केलेल्या गायनाला आरती असे म्हणतात. प्रस्तुत आरती हि करवीरनिवासिनी महालक्ष्मीची असून त्यात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या विविध रूपांचे दर्शन होते. -------- Part of Series "Kulswamini Manaspooja" and "Tujhe Roop Nyahalita"
आजही टेंभली एका वेगळ्या ब्रेकींग न्यूजमूळे चर्चेत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं टेंभलीला नवी झळाळी मिळतेय खरी, पण या कामांसाठी तिथल्याच आदिवासींच्या मुलांना जुंपण्यात आलंय. सरकारी यंत्रणेपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वाचं टेंभलीकडे लागलंय....पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे टेंभलीचा कायापालट करण्याचं काम जोरात सुरु आहे.
कोण आहे मराठी सिनेमातील द मोस्ट ग्लॅमरस नायिका, हे तुम्हीच ठरवायचे आहे. कोण आहे तुमच्या मनातील द मोस्ट ग्लॅमरस चेहरा...
Increasing traffic is annoying Puneites. The MLA's of various parties expressed their views recently.
madhura-abhijit sawant
मुंबई - पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड हिमायत बेग हा दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका गेस्ट हाऊसमध्ये राहात होता, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकातील सुत्रांनी साम मराठीला दिली.
कॅमेऱ्यामुळे सापडले चोर! (व्हिडिओ) पुणे - शहरातील लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत चालली आहे. भुरट्या चोऱ्या हा त्यापैकीच एक प्रकार, दुकानांमध्येही चोरीचे सर्रास प्रकार घडत असतात. मात्र, तंत्रज्ञानातील बदलामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात. असाच एक गुन्हा पिंपरी येथील नेहरूनगरमध्ये घडला. परंतु, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोर अलगद सापडले गेले. या व्हिडिओचे फुटेज "साम मराठी'ला मिळाला आहेत. "ई-सकाळ'च्या वाचकांसाठी ते आम्ही देत आहोत. (स्टोरी - अमित गोळवलकर, साम मराठी)
गौरीची प्रतिष्ठापना दोन पद्धतीने करता येते. पहिली पारंपरिक मुखवटा पद्धत आणि दुसरी कलश स्थापनेने. यापैकी कलश गौरीची प्रतिष्ठापनेची माहिती सांगताहेत प्रिया भोसले...
मुख्यमंत्री की अज्ञानमंत्री? महाराष्ट्रातल्या इतिहासात सर्वाधिक बचावात्मक बोलणारे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांची नवी ओळख झालीये. कोणतीही माहिती विचारली की पाहतो...बघतो...माहिती घेतो...अशी टिपिकल `सरकारी` उत्तर ठरलेली असतात. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या या `अजाणतेपणाचा` साम मराठीनं केलेला हा पंचनामा...
लालबागचा राजा... (व्हिडिओ) लालबाग हे सर्वांचंच आकर्षण. लालबागच्या साध्या मुखदर्शनासाठीदेखील भाविक तासन्तास रांगेत थांबतात. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अखेर तो क्षण आला, आणि भाविकांनी लालबागच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक (व्हिडिओ) हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन शनिवारी समस्त सांगलीकरांनी अनुभवले. गेल्या काही वर्षांपासून मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा यावर्षीदेखील राखली गेली.
गणरायाचा मनमाड ते मुंबई प्रवास मनमान रेल्वे स्टेशन शनिवारी ढोल- ताशांच्या गजराने निनादून गेले. निमित्त होते गणरायाच्या आगमनाचे. मनमाड - मुंबई या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
शर्वरीने केली बाप्पांसाठी खरेदी (व्हिडिओ) विविध भावमुद्रांनी रसिकांना मोहिनी घालणाऱ्या शर्वरी जेमेनिस या अभिनेत्रीला गणपतीचे साजरे रूप मोहविते. त्यामुळेच तिने घरी बसणाऱ्या गणपती बाप्पासाठी प्रचंड खरेदी केली.
पुण्यात गणरायाचे उत्साहात स्वागत (व्हिडिओ) विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत पुणेकरांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात केले. मोरया...मोरया...जयघोषाने पुण्यनगरी भक्तिरसात तल्लीन होऊन गेल्याचे चित्र होते.
दगडूशेठ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना (व्हिडिओ) पुणे - गणपती बाप्पाचा जयघोष आणि ढोल-ताशा व तुताऱ्यांच्या निनादात दगडूशेठ हलवाई गणपती गणपतींची प्रतिष्ठापना मिरवणूक शनिवारी सकाळी काढण्यात आली. दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना योगाचार्य के. पी. एस. अय्यंगार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजून 57 मिनिटांनी झाली.
लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणं मोफत यंदाही चहा-नाश्त्याची सोय करण्यात आलीय. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा तब्बल तीनशे जणांचे हात या सुविधेसाठी राबणार आहेत.
लालबागचा राजा म्हणजे भाविकांचा लाडका बाप्पा...नवसाला पावणारा देव अशी त्याची श्रद्धा...दरवर्षी राजाचं दर्शन घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळं रांगेत उभं राहणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी यंदा आधुनिक सोयीसुविधा करण्यात आल्यात.
गणराया सर्वांचं लाडकं दैवत. बाप्पाच्या विविध आकारातील मूर्ती. त्याची प्राणप्रतिष्ठा, आरती, सगळं मनोभावे करताना, देखण्या रुपाकडे पाहून नकळत हात जोडले जातात. गणपती रुप त्याच्या डोळ्यामुळं उठून दिसत. बाप्पाच्या डोळ्यांसाठी लेन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु झालाय.

